रत्नागिरी विभागाच्या वाट्याला यातील ३४ शिवशाही आल्या. पाच वर्षे झाली. या गाड्या अजूनही सुस्थितीत आहेत; परंतु साध्या गाड्या आणि शिवशाही गाड्यांमध्ये मोठा फरक आहे.
रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (Maharashtra Road Transport Corporation) एसटीकडे प्रवासी आकर्षित करण्यासाठी एसटीच्या ताफ्यात पाच वर्षांपूर्वी आलिशान शिवशाही गाड्या (Shivshahi ST Bus) आल्या. रत्नागिरी विभागाला त्यातील ३४ गाड्या मिळाल्या. वातानुकूलित, आरामदायी गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, अशी महामंडळाची धारणा होती; परंतु शिवशाही बस म्हणजे पांढरा हत्ती पोसल्यासारखे झाले आहे.