पाली - नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या परिसरात वसलेल्या 'डांग्या सुळका' या नैसर्गिक आणि थरारक सुळक्यावर एक सुसंघटित आणि यशस्वी पिच क्लायम्बिंग मोहिम नुकतीच पार पडली. साधारणतः दोनशे फूट उंचीच्या या उभ्या सुळक्यावर, रायगड जिल्ह्यातील 'मॅकविला द जंगल यार्ड' या संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्यांच्या साहस, कौशल्य आणि संघभावनेच्या जोरावर हि चढाई पूर्ण केली.