Mahabaleshwar Satara connectivity project
esakal
खेड : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला थेट जोडण्यासाठी मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’च्या धर्तीवर तीन भुयारी मार्ग (बोगदे) उभारण्यात येणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे दोन्ही विभागांतील प्रवास अत्यंत जलद व सुलभ होणार आहे. महाबळेश्वर-तापोळा येथे १७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या केबल-स्टे ब्रिजचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला (Mahabaleshwar Satara connectivity Project) आहे.