The protest followed the alleged assault on Mahad Municipality Chief Officer Dhananjay Kolekar inside his office.
Sakal
महाड : महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना त्यांच्या दालनात भाजप नगरसेवक व कार्यकर्त्याकडून बुधवारी आठ जुलैला झालेल्या मारहाणीचे पडसाद नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये उमटले असून आज महाड नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम बंद आंदोलन केले व मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत या घटनेचा जाहीर निषेध केला.