

Awareness Programme Removes Fear of Witchcraft
Sakal
पाली : पेण शहराजवळील महाडिकवाडी गावात काही दिवसांपासून भूत, करणी, जादूटोणा होत असल्याची अफवा पसरवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते. यासंदर्भात पोलीस व महा. अंनिसने गावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती करून याबाबतची भीती घालवली. गावात जिवंत कोंबडा जमिनीत पुरणे, स्मशानभूमीत नारळ फोडणे, घरात मोठ्या आवाजात मंत्र-तंत्र करून दहशत पसरवणे अशा घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती.