Maratha Kranti Morcha : आंदोलनामुळे परिवहन महामंडळ व खाजगी वाहतूक बंद

अमित गवळे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सुधागड तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये गुरुवारी सुरु होती. त्यामुळे दुसऱ्या गावावरुन शाळेत जाण्यासाठी अनेक मुले निघाली होती. मात्र परिवहन मंडळाच्या बस तसेच खाजगी वाहतूक (मिनीडोअर व  रिक्षा) बंद होत्या.

पाली (जि. रायगड) : मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. 9) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या बस देखील बंद होत्या. मात्र अनेक शाळा बंद मध्ये सहभागी नव्हत्या मात्र अशावेळी खेड्यापाड्यातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बस च्या प्रतीक्षेत उभे असलेली दिसली.

सुधागड तालुक्यातील अनेक माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये गुरुवारी सुरु होती. त्यामुळे दुसऱ्या गावावरुन शाळेत जाण्यासाठी अनेक मुले निघाली होती. मात्र परिवहन मंडळाच्या बस तसेच खाजगी वाहतूक (मिनीडोअर व  रिक्षा) बंद होत्या. ही कल्पना या शाळकरी मुलांना नसल्याने ते शाळेत जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Bandh PMPL And Privates Bus Are bandh due to maratha kranti morcha