मोठी बातमी : महाराष्ट्र - गोवा सीमा केली सील... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

वाहतूक पूर्णतः बंद - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सतर्कता 

बांदा - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज महाराष्ट्र-गोवा सीमा सील करण्यात आली. सीमेवर पत्रादेवी येथे गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांनी नाके उभारून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. 

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनता कर्फ्यु तीन दिवस जाहीर केला आहे. त्यामुळे गोव्यातील सर्व व्यवहार तीन दिवस बंद राहणार आहेत. राज्यात महाराष्ट्रातून येणारी वाहने रोखण्यासाठी गोवा शासनाने सीमेवर पत्रादेवी येथे तपासणी नाका उभारला आहे. येथे गोव्याची सीमा पूर्णपणे सील केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा परिसरातील 60 टक्के युवक हे गोव्यात नोकरीनिमित्त दररोज प्रवास करतात. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना देखील गोव्यात प्रवेश बंदी केली आहे. गोव्यात जाणारी बससेवा, खासगी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग सीमेवर पत्रादेवी, न्हयबाग येथे गोवा पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra - Goa Border Kelly Seal