महाराष्ट्र- गोवा सीमा सील

 Maharashtra Goa Border Seal
Maharashtra Goa Border Seal

बांदा - (सिंधुदुर्ग) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज महाराष्ट्र-गोवा सीमा सील करण्यात आली. सीमेवर पत्रादेवी येथे गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांनी नाके उभारून वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. 

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनता कर्फ्यु तीन दिवस जाहीर केला आहे. त्यामुळे गोव्यातील सर्व व्यवहार तीन दिवस बंद राहणार आहेत. राज्यात महाराष्ट्रातून येणारी वाहने रोखण्यासाठी गोवा शासनाने सीमेवर पत्रादेवी येथे तपासणी नाका उभारला आहे. येथे गोव्याची सीमा पूर्णपणे सील केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा परिसरातील 60 टक्के युवक हे गोव्यात नोकरीनिमित्त दररोज प्रवास करतात. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना देखील गोव्यात प्रवेश बंदी केली आहे. गोव्यात जाणारी बससेवा, खासगी वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. सिंधुदुर्ग सीमेवर पत्रादेवी, न्हयबाग येथे गोवा पोलिसांचे विशेष पथक कार्यरत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com