"भास्कर जाधव आम्हाला फार त्रास देतात, प्लीज त्यांना मंत्री करा"

maharashtra subject devendra fadnavis criticism on bhaskar jadhav political marathi news
maharashtra subject devendra fadnavis criticism on bhaskar jadhav political marathi news

सिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसांपासून अर्थसंकल्पावर अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अर्थसंकल्पाच्या मुद्यावर हमरीतुमरी देखील झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ मार्चला विधानसभेत अर्थसंकल्प मांडला त्यावेळी सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी वेगवेगळ्या प्रश्‍नावर धारेवर धरले. सत्ताधारी कधी विरोधकांना शाब्दिक टोले मारायचे तर विरोधक ह्यावर प्रत्युत्तर देत धारेवर धरत होते.

बुधवारी (दहा मार्च) झालेल्या विधानसभेतील चर्चेमत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांच्यावर निशाणा साधला. सदनात कोणी किती वेळ बोलायचे यावर टाेमणा मारला. यावेळी संपूर्ण सभागृहांत हास्य कोळ माजला. यावेळी फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांकडे नजर फिरवत भास्करराव जाधव यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले, प्लीज भास्कररावांना मंत्री करा, फार त्रास देतात ते आम्हाला अशी टिप्प्णी केली.

दरम्यान माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी विधानसभा अध्यक्षांना वेळेची मर्यादा ठेवण्याची विनंती केली. ते म्हणाले ,कोण किती वेळ बोलणार? याला काही मर्यादा आहेत की नाहीत. आम्ही या ठिकाणी कशाला आलो आहोत? विधानसभा अध्यक्षांनी वेळेचे भान राखावे अशी सूचना यावेळी सदनातील सदस्यांनी केली.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेळ जरूर सांगा पण जे पहिले वक्ते असतात त्यांना आपण दीड तासांचा वेळ देतो, अशी परंपरा आहे. तेवढ्यात कुणीतरी म्हणाले,भास्करराव तुम्हाला मंत्री करणार आहेत. या वाक्यावरून सभागृहात गोंधळ उडाला.
हेही वाचा- कुणकेश्‍वर यात्रा आजपासून साधेपणाने


यावर जाधव म्हणाले ,पॉईंट ऑफ प्रोसिजर उभा आहे आणि तो असं सांगतो की कुठलीही चर्चा सुरू होण्यापूर्वी चर्चेला जोर ठरलेला असतो त्यातील निम्मा वेळ सत्ताधारी पक्षाला त्यात मंत्र्यांच्या उत्तरासाठी आणि विरोधी पक्षाला अपक्षांसह निम्मा वेळ दिला जातो.  त्यामुळे  आमदार साळुंखे यांनी मांडलेला मुद्दा  योग्य आहे. विरोधी पक्षाला वेळ ठरवून दिलेल्या वेळेतच त्यांनी एकट्यानेच बोलावे याला आमचा विरोध नाही पण आमचा हक्काचा वेळ आम्हाला मिळालाच पाहिजे.

विरोधी पक्षांच्या आणि सत्ताधार्‍यांच्या या मिश्किली वक्तव्याने यावेळी सभागृह बराच वेळ गोंधळले होते. शेवटी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधी पक्षाने निम्मा वेळ वाटून घ्यावा आणि नवीन लोकांना संधी दिली तर बरे होईल अशी सूचना विधानसभा अध्यक्ष अशोक पवार यांनी केली.

 संपादन- अर्चना बनगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com