ऐन दिवाळीत लालपरीची सवारी महागणार ?

एसटी कर्मचारी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
ST-Bus
ST-Bus
Updated on
Summary

एसटी कर्मचारी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कणकवली : गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस तिकीटात दरवाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत येत्या सोमवारी (२५) निर्णय होणार असून १७ टक्के दरवाढ होण्याची शक्यता एसटीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

गेल्या दोन वर्षांत कोरोना कालावधीमध्ये एकीकडे होणारी इंधनाची दरवाढ आणि घटनारे प्रवासी लक्षात घेता एसटीचा डोलारा अडचणीत आला आहे. गेल्या काही महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांची पगारही वेळेवर झालेले नाही. यामुळे राज्यभरात आत्महत्येच्या ही घटना घडल्या होत्या. एसटी कर्मचारी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. एसटी ही सर्वसामान्यांची जिवनवाहिनी असल्याने ती टिकण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे मतही एसटीच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आले.

ST-Bus
रिफायनरीचे 'PRO' म्हणून प्रमोद जठारांची नेमणूक करा

एसटी महामंडळाच्या माध्यमातून जून २०१८ मध्ये यापूर्वी तिकीट दरवाढ झाली होती. त्यानंतरच्या कालावधीमध्ये राज्यावर आलेली अनेक संकटे, त्यातच कोरोना संकटामुळे एसटीचा डोलारा कमालीचा ढासळला आहे. डिझेलच्या दरात दोन वर्षांत २५ रुपये पेक्षा अधिक वाढ झाली आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे दर महिन्याला एसटीला शेकडो कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार होत नसल्याने आतापर्यंत राज्यभरात २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे एसटीवर मोठे संकट ओढवले आहे.

कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष

वेळेत पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. त्यातच येत्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ताठर भूमिका घेत. आता एसटी महामंडळाला तिकीट वाढीच्या प्रस्तावाबाबत चर्चा करून येत्या दोन दिवसांत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता एसटीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ST-Bus
'येत्या 2 दिवसांत खोदाईचे काम मार्गी लावा'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com