esakal | महाविकास आघाडी फेविकोलने चिकटल्यासारखी मजबूत़ः अब्दुल सत्तार
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi As Strong As Favicol Abdul Sattar Comment

म्हाप्रळ पंचक्रोशीतील नागरिकांची पुलाअभावी होणारी अडचण लक्षात घेता पुलाचे काम सुरू असतानाच म्हाप्रळ - आंबेत फेरी बोट सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती.

महाविकास आघाडी फेविकोलने चिकटल्यासारखी मजबूत़ः अब्दुल सत्तार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मंडणगड ( रत्नागिरी ) - शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस ही महाविकास आघाडी फेविकोलने चिकटल्यासारखी घट्ट मजबूत आहे. तटकरे व कदम यांच्यातील संघर्षांसारखे छोटे छोटे अपघात राजकारणात होतच असतात. कुणी काय केलं यावर जास्त भाष्य न करता संबंधित खात्याचा मंत्री म्हणून आंबेत-म्हाप्रळ फेरीबोट सेवेच्या कामाचे अधिकृत भूमिपूजन झाल्याचे जाहीर करतो, असे सांगत महसूल, ग्रामविकास, बंदरे व खारजमिनी विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा वाद बाजुला सारला. 

29 ऑक्‍टोबरला त्यांच्या हस्ते आंबेत-म्हाप्रळ फेरीबोट सेवेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत पूल नादुरूस्त झाल्याने सध्या अवजड वाहतुकीस बंद आहे. पुलाचे सुदृढीकरणाचे काम राज्यशासनाने हातात घेतल्यानंतर वाहतूक पूर्णपणे बंद होणार आहे.

म्हाप्रळ पंचक्रोशीतील नागरिकांची पुलाअभावी होणारी अडचण लक्षात घेता पुलाचे काम सुरू असतानाच म्हाप्रळ - आंबेत फेरी बोट सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी करून बोटीसाठी म्हाप्रळ व आंबेत अशा दोन्ही ठिकाणी जेटीची आवश्‍यकता व्यक्त केली होती. ही मागणी मान्य होऊन जेटीसाठी निधीची तरतूद झाल्याने जेटीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार कदम यांच्या पाठपुराव्यांमुळे अशी अनेक कामे पूर्णत्वास नेणार, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवणार असे सत्तार यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला सभापती स्नेहल सकपाळ, प्रणाली चिले, प्रताप घोसाळकर, विनोद जाधव, मुश्‍ताक मिरकर, समद मांडलेकर, संतोष गोवळे, शशिकांत चव्हाण, अस्मिता केंद्रे, संतोष मांढरे, प्रांताधिकारी पवार, तहसीलदार वेंगुर्लेकर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता मोहिते, उपअभियंता मंजुळे उपस्थित होते. 

"टायगर अभी जिंदा है' 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम असून कोकणच्या विकासासाठी पहिलं प्राधान्य ते देत आहेत. असे सांगुन रामदास कदम यांचा उल्लेख करताना "टायगर अभी जिंदा है' असा करत त्यांच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले. कदम यांनी राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांची कामेच त्यांची ओळख आहे, असेही सत्तार म्हणाले.