जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचाच विजय होणार; दीपक केसरकर

भाजपमध्ये सामील झालेल्यांना विकासाशी देणेघेणे नसल्याने स्थानिक जनता निवडणूकीत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSakal
Updated on

देवगड - स्वर्गीय अप्पासाहेब गोगटे यांची भाजप आता राहिलेली नाही. भाजपमध्ये सामील झालेल्यांना विकासाशी देणेघेणे नसल्याने स्थानिक जनता निवडणूकीत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराचे युध्द असल्याची टीका आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केली. जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचाच विजय होईल असेही त्यांनी सांगितले.

येथील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर श्री. केसरकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अ‍ॅड. अविनाश माणगावकर, संदेश पारकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, माजी सभापती रवींद्र जोगल, उपतालुकाप्रमुख निवृत्ती उर्फ बुवा तारी, संतोष तारी, नगरसेविका हर्षा ठाकूर यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्री. केसरकर म्हणाले, आपण पालकमंत्री असताना कोणताही भेदभाव न करता स्थानिक विकासासाठी भरपूर निधी दिला. देवगडवर आपले प्रेम आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे आपणास भावासारखे आहेत. त्यामुळे विकास निधीमध्ये कमतरता ठेवलेली नव्हती. मात्र दिलेल्या निधीचा योग्य पध्दतीने विनियोग झालेला दिसला नाही. वॉटर एटीएमसाठी निधी दिलेला असतानाही अद्याप जनतेसाठी खुले झाले नाही.

Deepak Kesarkar
गुरे चोरट्यांचा धुमाकूळ, 8 गुरे चोरली; अनेक गुरे बेशुद्धावस्थेत सापडली

नागरिकांच्या मुलभूत प्रश्‍नांना बगल दिली गेली. नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यास येथील पाण्याचा प्रश्‍न निकाली काढून जनतेला चोवीस तास पाणी देण्याचा प्रयत्न राहील. केवळ पोकळ घोषणा नसून पाणी पुरवठा मंत्र्यांकडून त्यासाठी निधी उपलब्ध करू. तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत दिली. स्थानिक पर्यटन विकासाला निधी दिला. नगरपंचायत कार्यक्षेत्रात विकास न झाल्याने जनतेच्या नाराजीचा महाविकास आघाडीला फायदा होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चांदा ते बांदा योजनेतून भरपूर विकास निधी दिला. पुन्हा अशाच पध्दतीने योजना आणून ग्रामीण भागातील कुटुंबाना दिलासा देण्याचा प्रयत्न राहील असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ganeshotsav 2026: Thane Enhances Konkan Railway Ticket Booking with Additional Counters
Historic Satavali Fort conservation
Giant python rescued from house in Palghar
Insurance Shield for Coconut and Arecanut Farmers Under PMFBY
Marathi News Esakal
www.esakal.com