
रत्नागिरी : महावितरणची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. १ लाख २१ हजार ३५६ ग्राहकांनी महावितरणचे २८ कोटी ८८ लाख थकवले आहेत. त्यात शासकीय देणी अधिक आहेत. महावितरण कंपनीने समज, नोटिसा देऊनही ग्राहक थकबाकी भरत नसल्यामुळे कंपनी वसुलीसाठी अॅक्शन मोडवर आली आहे.