महाविकास आघाडीकडून काळप यांनी तर महायुती प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडी गटाकडून बांदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
कुडाळ : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Kudal Mayoral Election) ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका श्रुती वर्दम यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) विरोधात जात मतदान केल्यामुळे बांदेकर या नगराध्यक्षापदी निवडून आल्या. ठाकरे शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीच्या सई काळप यांना पराभवास सामोरे जावे लागले.