esakal | फिल्मीस्टाईलने चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्याकडे मागीतली खंडणी अन्
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh Manjrekar case investigation concluded no connection  the gangster

युट्युबवरून सूचली त्याला खंडणीची कल्पना

मांजरेकर खंडणी प्रकरण; गँगस्टरशी संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न

फिल्मीस्टाईलने चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्याकडे मागीतली खंडणी अन्

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी :  रिकामे डोके सैतानाचे, म्हणतात ते खरच. कोणत्याही कुख्यात टोळीतील गुन्हेगारांशी संबंध नसताना गॅगस्टर अबू सालेम याच्या नावाने मेसेच पाठवून चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्याकडे 35 कोटीची खंडणी मागणे साखरोळी (ता. खेड) येथील चहावाल्याला चांगलेच भोवले. लॉकडाउनमुळे रिकाम्या वेळेत युट्यूबवरून झटपट श्रीमंत होण्याची कल्पना त्याला सुचली आणि गुन्हेगारीची कोणतीही पार्श्‍वभुमी नसतानाही ती चांगलीच महागात पडली.  


मिलिंद बाळकृष्ण तुळसरणकर (रा. साखरोळी, ता. खेड) असे मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या त्या खंडणीबहाद्दराचे नाव आहे. मुळचा साखरोळी खेड येथील असला तरी तो ठाणे जिल्ह्यातील दिव्यात चहाची टपरी चावलतो. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे देश लॉकडाउन झाला आणि सर्वच व्यवसाय ठप्प झाले. काहीच काम नसल्याने त्याच्या रिकाम्या डोक्यात नको ती आयडिया आली. पैसे कसे मिळवायचे याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याने त्याने युट्युबाचा वापर केला. ते सर्च करता करता त्याला झटपट पैसे मिळविण्यासाठी डोक्यात खंडणीची कल्पना सुचली.

हेही वाचा- समुद्र कोपला, भाट्येकिनारी तीन मीटर आत घुसला... किती झाले नुकसान, काय आहे धोका वाचा

त्याने गॅगस्टर अबू सालेम यांची युट्यूबवरून सर्व मााहिती गोळा केली. त्यानंतर एका वेबसाइटवर जाऊन त्यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माता महेश मांजरेकर याचा मोबाईल नंबर मिळवला. त्याने अबू सालेम याच्या नावे मेसेज पाठवून 35 कोटीची खंडणी मागितली. या प्रकरणामुळे सिनेसृष्टीमध्ये एकच खळबळ उडाली.
खंडणीसाठी त्याने कॉलसह   मेसेज पाठवले होते. यामध्ये आपण अटक होण्याच्या भीतीने तुळसणकर या संशयिताने खेड गाठले. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने त्याचा शोध लावला. संशयित साखरोळी (ता. खेड) येथे असल्याची माहिती मिळाली. खंडणी विरोधी पथक खेडमध्ये पोचले. त्यांनी स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेऊन संशयिताला जेरबंद केले. त्याच्याकडुन दोन सिमकार्ड आणि काही वस्तू पोलिसांनी जप्त केली आहे. त्याचा कोणत्याही गँगस्टरशी संबंध नसल्याचेही तपासात पुढे आले आहे.


संपादन - अर्चना बनगे

loading image