दरवर्षी नाताळ सुटीसह नववर्ष स्वागताला येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्याप्रमाणे यंदा २१ डिसेंबरपासून पर्यटक येण्यास सुरुवात झाली.
रत्नागिरी : जोडून आलेल्या सुट्यांमुळे गेले आठवडाभर गणपतीपुळेत (Ganpatipule) पर्यटकांची (Tourist) प्रचंड गर्दी झाली आहे. यंदाच्या वर्षातील गर्दीचा उच्चांक मोडणारा शनिवार (ता. २८) ठरला. रविवारही दिवसभर गर्दी होती. दोन दिवसात सरासरी २५ हजारहून अधिक पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतले. चारचाकीसह खासगी वाहने घेऊन येणाऱ्यांची गर्दी अधिक असल्यामुळे सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.