Holi Celebration : मळगाव जपतोय होळीची आगळीवेगळी परंपरा; सुवार्डा डोंगराच्या शिखरावर उभारणी

एक होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गाव.
suvarda Mountain holi festival
suvarda Mountain holi festivalsakal
Updated on

सावंतवाडी - प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या अशा काही ठराविक परंपरा असतात. काही गाव तर या आगळ्यावेगळ्या परंपरा जोपासण्यासाठी ओळखले जातात. अशीच एक होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारा गाव म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गाव. या गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची मानाची पहिली होळी उभारली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची भगवा निशाण लावून पहिली होळी उभारून मळगाव गावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com