malvan beach crowd
sakal
मालवण (जि. सिंधुदुर्ग) - नाताळची सुटी आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांच्या ओघाने मालवण तालुका अक्षरशः हाउसफुल्ल झाला आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी आणि चिवला बीच यांसारख्या प्रमुख किनारपट्ट्या पर्यटकांनी फुलून गेल्या असून, या हंगामात पर्यटन व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे.