
मालवण : धामापूर तलावात 'मृत माशांचा' खच
मालवण : तालुक्यातील प्रसिद्ध तसेच ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या श्री देवी भगवती मंदिराशेजारील धामापूर तलावात गेल्या चार दिवसांपासून अचानक आणि मोठ्या प्रमाणावर लहान-मोठे मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. संपूर्ण तलावाच्या काठावर मृत माशांचा खच पडला आहे. त्याची परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. धामापूर भगवती मंदिर आणि तलावाच्या सुमारे ४५० ते ५०० वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे स्थानिक जाणकारांनी सांगितले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत कसे झाले, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु १७ मार्च २०२२ पासून गावकऱ्यांमधील अंतर्गत वादावरील धामापूर तलावामध्ये गेल्या चार दिवसांत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे दिसून आले आहे; मात्र हे मासे कसे मृत झाले, याचे निदान अद्यापही झालेले नाही. या संदर्भात पाण्याचे नमुने उद्या सकाळी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. धामापूर नळपाणी योजनेवरून पाणी घेणाऱ्या सर्वांनी पाणी उकळून व गाळून घ्यावे, अशा सूचना ग्रामपंचायतीने केल्या आहेत. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक ती औषधे उपलब्ध करून दिली आहेत.
- केशव सावंत, सरपंच, काळसे
Web Title: Malvan Dead Fish In Dhamapur Lake Stink Area Water Contaminated
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..