Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
esakal
मालवण : दहा दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मांसाहारी खवय्यांची पावले आता थेट मासळी बाजाराकडे वळू लागली (Malvan fish prices) आहेत. मात्र, बाजारात पाऊल ठेवताच मासळीचे गगनाला भिडलेले दर पाहून खवय्यांच्या अंगाचा तीळपापड होत आहे. नव्या मासेमारी हंगामाची झालेली मंद सुरुवात, समुद्रातील हवामानात सातत्याने होणारे बदल आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे पापलेट, सुरमई, बांगडा आणि कोळंबी या सर्वच प्रमुख माशांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. केवळ कच्ची मासळीच नव्हे, तर हॉटेलमधील स्पेशल ‘मच्छी थाळी’च्या दरांमध्येही मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य खवय्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.