Malvan primary school teacher transfer protest
esakal
मालवण : तोंडवळी खालची येथील पूर्व प्राथमिक शाळेतील एका चांगल्या शिक्षकाची अन्यत्र बदली केल्याच्या निषेधार्थ पालकांनी गेल्या पाच दिवसांपासून आपल्या मुलांना शाळेत पाठविणे बंद केले (Parents protest teacher transfer in Sindhudurg) आहे. या गंभीर प्रश्नावर आज पालकांनी थेट पंचायत समितीत धडक देऊन प्रशासनाला जाब विचारला. येत्या सोमवारपर्यंत संबंधित शिक्षक शाळेत हजर न झाल्यास आम्ही सर्व पालक आपल्या पाल्यांचे शाळेतून दाखले काढून घेऊ, असा आक्रमक इशारा पालकांनी प्रशासनाला दिला.