आरोपी प्रकाश वाघे याने लाकडे शोधायला गुरांकडे चल, असे म्हणून तिला कलांडी येथील जंगलमय भागात घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार करून लैंगिक अत्याचार केला.
चिपळूणः सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार (Girl Abuse) केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४०, गुहागर) याला चिपळूण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याला २५ हजारांचा दंडही केला आहे. ही घटना ६ ऑक्टोबर २०१९ ला घडली होती.