...तर मनसैनिक पहारा देतील 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 March 2020

जिल्ह्यात सध्या अवैद्य वाळू वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आला असुन अलिकडेच पंधरा दिवसापुर्वी सावंतवाडी महसुल विभागाने झाराप पत्रादेवी महामार्गावरून पहाटेच्या सुमारास विनापरवाना वाळूची चोरटी वाहतुक करणारे दोन डंपर ताब्यात घेतले होते; मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने अशी वाहतुक दररोज राजरोजपणे सुरू आहे.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यातुन रात्रीच्या वेळी झाराप पत्रादेवी महामार्गावरून होणारी बेकायदा व विनापरवाना चोरट्या वाळूची वाहतुक थांबवावी, अन्यथा मनसैनिक रात्रीच्या वेळी पहारा ठेऊन अशा गाड्या पकडतील, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी आज तहसिलदार राजाराम म्हात्रे यांना दिला. 

याबाबतचे निवेदनही त्यांनी दिले आहे. यात म्हटले आहे की, जिल्ह्यात सध्या अवैद्य वाळू वाहतुकीला मोठ्या प्रमाणात ऊत आला असुन अलिकडेच पंधरा दिवसापुर्वी सावंतवाडी महसुल विभागाने झाराप पत्रादेवी महामार्गावरून पहाटेच्या सुमारास विनापरवाना वाळूची चोरटी वाहतुक करणारे दोन डंपर ताब्यात घेतले होते; मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने अशी वाहतुक दररोज राजरोजपणे सुरू आहे. अशा पध्दतीने शासनाना महसुल बुडवून अवैद्यरित्या जिल्ह्याबाहेर होणाऱ्या वाळू वाहतुकीला आळा घालण्यात यावा, शिवाय महसुल विभागाने वाळूचा लिलाव लावुन ही वाळू जिल्ह्यातील लोकांना माफक दरात उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री. सुभेदार यांनी तहसिलदार म्हात्रे यांच्याजवळ केली.

यावेळी परिवहन कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, उपशहराध्यक्ष शुभम सावंत, ओमकार कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

श्री. सुभेदार म्हणाले, ""झाराप पत्रादेवी महामार्गावरून दररोज रात्री तसेच पहाटे गोवा राज्यात चोरटी वाळू वाहतुक होते. याकडे महसुल विभागाचा दुर्लक्ष आहे. महसुल विभागच्या कृपा आशिर्वादामुळे हा प्रकार सुरू असुन केवळ कारवाईच्या नावाखाली डंपर पकडून नंतर ते सोडून दिले जातात. हा सर्व प्रकार म्हणजे जनतेच्या डोळ्यात अंजन भरण्यासारखा आहे; मात्र मनसे असले प्रकारे खपवून घेणार नसुन शासनाचा महसुल बुडविणाऱ्या चोरट्या वाळू वाहतुकीवर येत्या आठ दिवसात कारवाई होऊन ही वाहतुक पुर्णपणे बंद न झाल्यास मनसैनिक रात्रीच्या वेळी पहारा ठेऊन असे वाहतुक करणारे डंपर अडवून महसुनच्या निदर्शनास आणुन देणार आहे.''

याबाबत महसुल विभागाकडून कार्यवाही करण्याची हमी तहसिलदार म्हात्रे यांनी दिल्याचे श्री. सुभेदार यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manase Organisation Will Took Action Against Sand Theft