विकेंड डेस्टिनेशनाला जायचे आहे?

मंडणगड किल्ला; विकेंड डेस्टिनेशन! स्थानिक अग्रभागी हिरवळीने मन प्रफुल्लित; ढग उतरल्याचा भास

विकेंड डेस्टिनेशनाला जायचे आहे?
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : वर्षा ऋतूत हिरवळीने बहरलेला मंडणगड किल्ल्यावरील निसर्ग मनाला भुरळ घालत आहे. पाण्याने तुडुंब भरलेले तलाव, विहिरी, हिरवळीने नवा साज परिधान केलेला परिसर, अंगाला झोंबणारा गार वारा हे सर्व किल्ल्यावर अनुभवायला मिळत असून स्थानिकांचे ते पावसाळी विकेंड ठिकाण झाले आहे. पहाटे पसरलेल्या धुक्याने आकाशातील ढग जमिनीवर आल्याचा भास होत असून धुक्यातून चालण्याचा आनंद लुटण्यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिक कुटुंबांसमवेत किल्ल्यावर भटकंती करीत आहेत.

Summary

मंडणगड किल्ल्याला राज्य शासनाने संरक्षित करावे; स्थानिकांची मागणी

मंडणगड किल्ल्यावर जाण्याकरिता डांबरी रस्ता असल्याने वयोवृद्ध नागरिक, पर्यटकांना किल्ल्यावर जाणे सोपे झाले. पावसाळ्यात अनेकांचा मंडणगड किल्ला म्हणजे विकेंड पर्यटन स्थळ झाले आहे. शहरातील अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी किल्ल्यावर जात आहेत. किल्ल्याने हिरवाईची शाल परिधान केली आहे. तलाव तुडुंब भरले आहेत. त्यात पोहण्याचा आनंद लुटला जात आहे. बदललेल्या निसर्गाचे रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात जतन केले जात असून मोबाईल चित्रीकरणाद्वारे त्याची प्रसिद्धीही केली जात आहे. किल्ल्याकडे शासन, प्रशासन व पुरातत्त्व विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने किल्ल्याच्या माध्यमातून पर्यटन विकासाची गाडी केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली आहे. पुरेशा सोयीसुविधांअभावी यामुळे अद्याप म्हणावा तसा पर्यटकांचा ओघ सुरू झालेला नाही. "

वस्ती करणे एक साहसी अनुभव

किल्ल्यावर वस्ती करणे एक साहसी अनुभव आहे. किल्ल्यावर दोन तळी, एक मंदिर, नामशेष तटबंदी व एक तोफ आहे. मानवी वावरांमुळे किल्ल्यावर चांगल्याबरोबरच वाईट गोष्टींनाही प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. प्रेमी युगुलांचा वावर, मद्यपींचा धुमाकूळ ह मानवी वावराचे दुष्परिणामही पुढे आले आहेत.

किल्ला राज्य संरक्षित व्हावा

कोकणातील अन्य किल्ल्यांप्रमाणेच मंडणगड किल्लाही राज्य शासनाने संरक्षित करणे गरजेचे आहे. केवळ ऐतिहासिक वारसा पुरेसा नसून पर्यटकांनी किल्ल्यास वारंवार येण्यास प्रवृत्त करणारे उपक्रम राबविणे, यात संग्रहालय, उद्यान, तळ्यात बोटिंगसारख्या उपक्रमांचा समावेश करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Heavy Rain, Dense Forest, Viral Rescue: Six Goa Trekkers Brought to Safety
Vat Purnima woman dies after worship
Marathi News Esakal
www.esakal.com