मंडणगड : डोंगर उतारावर बांधण्यात आलेला आंबडवे-लोणंद राजेवाडी राष्ट्रीय महामार्ग Ambadve-(Lonand Rajewadi National Highway) चक्क पावसाच्या साचलेल्या पाण्यात दिसेनासा झाला. नियोजन शून्य कामांचा फटका आंबडवे लोणंद या महामार्गाला बसला असून मंडणगड ते तुळशी दरम्यान अनेक ठिकाणी पाणी तुंबले. दरड कोसळून दगड, माती रस्त्यावर आली. गटाराची व्यवस्था नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहून नागरिकांच्या घरात घुसले. तालुक्यात १७७ मिमी पावसाची नोंद झाली. जनजीवन विस्कळीत झाले.