13 जागांकरीता 35 उमेदवार रिंगणात: मविआ समोर अपक्षांचे तगडे आव्हान

राष्ट्रवादी- सेना महाआघाडी समोर सेनेच्या बंडखोर अपक्षांचे तगडे आव्हान

NCP,Shivsena
Mahavikas Aaghadi
NCP,Shivsena Mahavikas AaghadiEsakal

मंडणगड : मंडणगड (Mandangad Nagar Panchayat Election) नगरपंचायतीच्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रीक निवडणुकीकरिता आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर 13 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता तब्बल 35 उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत. तर नगरपंचायतीच्या 4 जागांवर होणारी निवडणूक रद्द करण्यात आल्याने एकूण 17 जागापैकी 13 जागांकरिता ही सार्वत्रीक निवडणूक पार पडणार आहे.

मंडणगड नगरपंचायत निवडणुक रिंगणात अनेक प्रभागात बहुरंगी तर बऱ्याच दुरंगी लढती होणार हे नक्की झाले असून, मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीत एकत्र आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena,NCP, Congress) यांच्या महाविकास आघाडीसमोर शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांचे तगडे आवाहन उभे आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी आणि बंडखोर यांच्या लढतीकडे संपुर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागुन राहीले आहे. या सार्वत्रीक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णय प्रक्रीयेतून वगळण्यात आलेले शिवसेनेचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) हे त्यांच्या गटाच्या बंडखोरांना रसद पुरविणार की सेना राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांचा प्रचार करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना स्थान न दिल्याने त्यांच्या गटाच्या अपक्षांनी ते शिवसेनेचे विद्यमान पदाधिकारी असतानाही पक्षा विरोधात केलेली बंडखोरी व कायम ठेवलेली आपली उमेदवारी यामुळे शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सेना राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी असतानाही या दोन्ही पक्षांचे उमेदवार श्रध्दा चिले, शिवसेना शाहीन सय्यद राष्ट्रवादी यांनी आपआपले पक्षांचे ए.बी. फॉर्म कायम ठेवल्याने या प्रभागात महाविकास आघाडीतील तिढा वाढला आहे.

राष्ट्रवादीलाही बंडखोरीची लागण

शिवसेनेत बंडखोरींना महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुःखी वाढलेली असताना, प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते विजय पोटफोडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात असल्याने बंडखोरीची लागण सेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेस मनसेसह भाजपकडे उमेदवारांची वानवा- सन 2015 मध्ये मंडणगड नगरपंचायतीच्या झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइं आठवले गट यांच्या महाआघाडीने शिवसेनेला चार मुंड्या चित करीत 17 पैकी तब्बल 16 जागांवर विजय संपादन केला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे 5 नगरसेवक निवडुन आले होते.

मात्र सद्यस्थितीत काँग्रेसकडे पक्षाला पर्याय देणारे पँनेल तयार करता आले नाही. त्यामुळे गतवेळी 5 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला यावेळी केवळ 1 च उमेदवार निवडणुक रिंगणात उतरिवण्याची नामुष्की स्विकारावी लागली आहे. तर गत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 15 जागा लढविल्या होत्या. यावेळी मात्र दस्तुरखुद्द भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे यांच्यासह प्रभाग क्रमांक 5 मधून अनुराग कोळंबेकर असे दोनच उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविण्यात यश मिळाले आहेत. तर मनसेकडून कल्पेश शिंदे, मंदार वारणकर, सोनल पवार हे तिनच उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविण्यात यश मिळाले आहे. तर शिवसेनेत बंडखोरी केलेले 7 अपक्ष उमेदवार निवडणुक रिंगणात उतरले आहेत.


NCP,Shivsena
Mahavikas Aaghadi
महाआघाडीत संघर्ष? एकत्र येऊन लढायचं होतं पण...

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष वैभव कोकाटे, शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद जाधव, भाजपाचे तालुका अध्यक्ष विश्वदास लोखंडे, तर माजी बांधकाम सभापती व रिपाइंचे माजी नगरसेवक आदेश मर्चंडे, काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली रेगे या निवडणुक रिंगणात असल्याने त्यांच्या लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे.

मंडणगड नगरपंचायत प्रभाग निहाय उमेदवार खालील प्रमाणे :

प्रभाग क्रमांक 1-आदर्श नगर मधुन सुमित्रा निमदे (अपक्ष), सोनल बेर्डे अपक्ष), पुजा सापटे (शिवसेना) अशी तिरंगी लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक 2- बोरीचा माळ मधून शाहीन सय्यद (राष्ट्रवादी), सेजल गोवळे (अपक्ष), श्रध्दा चिले (शिवसेना) अशी तिरंगी लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक 4 - शिवाजीनगर मधून दीपक घोसाळकर (राष्ट्रवादी), कल्पेश शिंदे (मनसे), संजय राणे (अपक्ष), मुश्ताक दाभीळकर (अपक्ष), विजय पोटफोडे (अपक्ष), श्रीपाद कोकाटे (कांग्रेस आय) षटकोन लढत रंगणार आहे. प्रभाग क्रमांक ५ साईनगर मधुन राजाराम लेंढे (राष्ट्रवादी), योगेश जाधव(अपक्ष),अनुराग कोळंबेकर (भाजपा), अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 8- दुर्गवाडी 1मधून राजेश्री सापटे (राष्ट्रवादी), प्रिया पोस्टुरे (अपक्ष) अशी दुंरगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 10 -कोंझर मधून मुकेश तलार (राष्ट्रवादी), विश्वदास लोखंडे (भाजपा), मंदार वारणकर(मनसे) अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 11- धनगरवाडी येथून विनोद जाधव (अपक्ष), तुषार साटम (शिवसेना) अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 12 - तुरेवाडी-कुंभारवाडी मधून मनिषा हातमकर (राष्ट्रवादी), पुर्वा जाधव (अपक्ष) अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 13 - बौध्दवाडी 1 मधून आदेश मर्चंडे (रिपाइंं आठवले गट), सुप्रिया मर्चंडे (गाव पँनल), अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 14 - बौध्दवाडी 2 मधून अंजली मर्चंडे (गाव पँनेल), रेश्मा मर्चंडे (गाव पँनेल) अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 15 - गांधी चौक 2 मधून वैशाली रेगे (अपक्ष), प्रमिला कामेरीकर (राष्ट्रवादी) असी दुरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 16- गांधी चौक 1मधुन वैभव कोकाटे (राष्ट्रवादी), मनोज अधिकारी (अपक्ष) अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

प्रभाग क्रमांक 17- तुरेवाडी -सोनारवाडी मधून सोनल पवार (मनसे), समृध्दी शिगवण (राष्ट्रवादी), शारदा बने(अपक्ष) अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com