माणगाव : छोटी कोकीळचे माणगावमध्ये दर्शन

वनसंपदा संपन्न असल्याचे द्योतक
Kokan
KokanSakal
Updated on: 

माणगाव : वन्यजीव अभ्यासक आणि छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांनी शनिवारी (ता.२५) माणगाव येथे ‘लेसर कुकू’ (Laser Cuckoo) म्हणजेच आफ्रिकन छोटा कोकीळ या पक्ष्याची नोंद केली. युरेशिअन कुकू म्हणजेच सामान्य कोकीळसारखाच हा पक्षी असून त्याची ओळख करणे कठीण असते. पूर्ण वाढ झालेला पक्षी (Bird) निळसर राखाडी रंगाचा असून छातीवर काळे पट्टे असतात. आकाराने थोडा छोटा असून त्याचे डोळे गडद तपकिरी असतात. छोटे कोकीळ हे मुख्यतः त्यांच्या मधुर गाण्यासाठी ओळखले जातात.

पावसाळा संपताच काही कोकीळ प्रजाती भारतभर स्थलांतर करतात. त्यातील अल्प कालावधीसाठी स्थलांतर करणारा हा छोटा कोकीळ पक्षी असून आफ्रिकेतून स्थलांतर करून दक्षिण भारतात सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान हे पक्षी दिसून येत असल्याच्या काही मोजक्याच नोंदी आहेत. कोकणातील सध्याचे वातावरण अनेक पक्ष्यांसाठी अनुकूल असते. त्यांना येथे मुबलक खाद्य मिळते, असे कुवेसकर यांनी सांगितले.

या पक्ष्याच्या दर्शनामुळे येथील वनसंपदा संपन्न असल्याचे समजण्यात येत आहे. गेल्या २० वर्षांमध्ये कोकण, तसेच सोबत मुंबई परिसरातून छोटा कोकीळ या पक्ष्याच्या अवघ्या सहा ते सात अधिकृत नोंदी असल्याचे मुंबई येथील पक्षीनिरीक्षक व निसर्गवादी लेखक संजय मोंगा यांनी सांगितले. या कोकीळ पक्ष्याचे प्रजनन हिमालय व उत्तर-पूर्व भारतात चांगल्या प्रमाणात होत असल्याचे ते म्हणाले.

Kokan
दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'चा ऐतिहासिक जावळी खोऱ्यात वावर

छोटा कोकीळ हा दुर्मिळ पक्षी वसंत ऋतूचे आगमन दर्शवत असून त्याचा स्थलांतराचा मार्ग शक्यतो दक्षिणेकडील भारत असून महाराष्ट्रात त्याला पाहणे निश्चितच रोमांचक आहे. अशा पक्ष्यांचे आपल्या परिसरातील वास्तव्य वनसंपदा संपन्न असल्याचे दर्शवत असून हा प्रदेश संरक्षित करणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com