गतवर्षीही प्रतिकूल वातावरणाचा फटका बसून झालेल्या नुकसानीने आंबा-काजू बागायतदारांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले होते.
राजापूर : गतवर्षी प्रतिकूल वातावरणामुळे आंबा-काजू बागायतदारांच्या (Mango and Cashew Orchardist) झालेल्या नुकसानीने कंबरडे मोडले होते. अशा स्थितीमध्ये शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत (Crop Insurance Scheme) नुकसानीपोटी तब्बल १४ कोटी २५ लाख ५४ हजार ३२२ रुपयांची पीक विमा नुकसानभरपाई मिळाली आहे.