यंदा आंब्यावरील मोहोर लांबणार

mango bloom will be extended for this year in ratnagiri due to changes in atmosphere
mango bloom will be extended for this year in ratnagiri due to changes in atmosphere
Updated on

रत्नागिरी : दिवाळीत गुलाबी थंडीने हजेरी लावल्यावर आंबा बागायतदारांचे चेहरे खुलले होते. अवघ्या दोनच दिवसांत वातावरण बदलले आणि पुन्हा उष्मा वाढला. पारा ३६ अंश सेल्सिअसवर गेल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले. थंडी नसेल तर मोहोर येण्यास उशीर होणार आहे. २००९ मध्ये झालेल्या फयान वादळानंतर सातत्याने वातावरणात अशा प्रकारे बदल होत असून, त्याचा परिणाम आंबा हंगामावर होत आहे.

हापूस हे संवेदनशील पीक बनले आहे. किमान, कमाल तापमानातील बदल आंबा पिकाला मारक ठरत आहेत. यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती व्यक्‍त केली जात होती. ती आता खरी ठरू लागली आहे. ऑक्‍टोबरच्या अखेरपर्यंत परतीचा पाऊस सुरूच होता. नोव्हेंबरच्या सुरवातीला थंडीला सुरवात झाली.

दापोलीत पारा ११.०९ अंशांपर्यंत घसरला होता. त्या वेळी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर अचानक पारा वर चढू लागला. किमान तापमान २३ अंश असून कमाल तापमान ३६ अंश आहे. अकरापासून उन्हाचा कडाका सहन न करण्याएवढा जाणवत आहे. उशिरापर्यंतच्या पावसामुळे ८० टक्‍के कलमांवर पालवी आली आहे.

"या महिन्यात थंडी वाढली नाही तर मोहोर येण्यास उशीर होईल. आंबा हंगामाचे पुढील भवितव्य हे थंडीवर अवलंबून आहे. फयान वादळ झाल्यावर वातावरणात विचित्र बदलत होत आहेत."

- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com