सर्वसामान्यांसाठी हापुस अजून आंबटच; उत्पादन व आवक कमी

अमित गवळे
रविवार, 5 मे 2019

पाली : हापुस आंब्याचे कमी उत्पादन व अपुरा पुरवठा यामुळे हापूस आंब्याच्या किंमती तीनशे ते चारशे रुपये डझनावर गेल्या आहेत. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड झाले आहे.

पाली : हापुस आंब्याचे कमी उत्पादन व अपुरा पुरवठा यामुळे हापूस आंब्याच्या किंमती तीनशे ते चारशे रुपये डझनावर गेल्या आहेत. त्यामुळे हापूस आंबे खाणे सर्वसामान्यांसाठी अवघड झाले आहे.

अनियमित व खराब हवामानामुळे यंदा जिल्ह्यातील आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. आंब्याच्या उत्पादनात जवळपास 70 ते 80 टक्के घट झाली आहे. त्यामुळे हापूस आंब्याची खूप कमतरता आहे. रत्नागिरी व देवगडचा हापूस देखील थेट वाशी मार्केटला जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात हापूस कमी दिसत आहे. कर्नाटकी, पायरी, तोतापुरी, निलम, गावठी, बिटके (छोटे) आंबे आदी विविध प्रजातींचे आंबे काही प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. तरी खवय्यांना हापूस स्वस्त होइपर्यंत थोडे थांबावे लागणार आहे. 

स्थानिक आंब्यांना पसंती
जिल्ह्यातील अनेक आदिवासी जंगलात किंवा परसबागेत लावलेल्या आंब्याच्या झाडांवरील आंबे बाजारात टोपल्यांमधून घेवून विक्रिसाठी येत आहेत. तर विविध फार्महाऊसच्या बागांमध्ये मधील आंबे देखील विक्रिसाठी येत आहेत. सेंद्रिय व नैसर्गिकरित्या वाढ झालेले हे आंबे आरोग्यास उत्तम असतात. मात्र हे हापूस आंबे देखील 300 ते 400 रुपये डझन मिळत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर रेलचेल
देवगड व रत्नागिरीचा हापूस मोठ्या प्रमाणात मुंबईच्या मार्केटमध्ये नेला जातो. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर सध्या देवगड रत्नागिरीच्या हापूसच्या पेट्या वाहून नेणार्या वाहनांची रेलचेल पहायला मिळत अाहे. 
 
''या वर्षी हापूस आंब्यांची आवक कमी आहे. उत्पादन घटले आहे. वाशी मार्केट मधून माल आणतो. छोटा हापूस आंबा 150 रुपये डझन तर त्याहून मोठे आंबे 250 ते 300 रुपये डझन विकत आहोत. मागील वर्षी हापूसच्या किंमती तुलनेने कमी होत्या. तरी देखील यंदा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे.''
- अशोक ओसवाल, आंबे विक्रेते, पाली

''हापूसच्या किंमती जास्त असल्याने खरेदीला आवर घातला आहे. काही दिवसांनी किमती कमी झाल्यावरच हापूस खरेदी करू.''
- नम्रता सुर्वे, हाऊसप्रेमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mango prices are still unaffordable for the common man