आंबाप्रेमींनो यंदा तुम्हाला हापूसची वाट पाहावी लागणार ?

mango season and hapus mango postponed for this year in ratnagiri chiplun
mango season and hapus mango postponed for this year in ratnagiri chiplun
Updated on

चिपळूण : कोकणात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. पावसाने मोहोर गळून पडले आहे. तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी उत्पादनावर परिणाम होणार आहेच. शिवाय बाजारातही हापूस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आंबाप्रेमींना या वर्षी हापूसची वाट पाहावी लागणार आहे. 

कोकणातील हापूस आंब्याला नोव्हेंबर महिन्यात मोहोर फुटण्याची प्रक्रिया अंशत: सुरू होते; मात्र डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील आंब्यांच्या बागांना मोहोर फुटणे सुरू होते. या वर्षी डिसेंबर महिना अर्धा संपण्याच्या मार्गावर आहे. तरीही म्हणावी तशी थंडी पडत नसल्यामुळे अपेक्षेप्रमाणे आंब्याच्या झाडांना मोहोर दिसत नाही. हवामान बदल, ढगाळ वातावरण, धुके, अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या पिकाला तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून काळे डाग पडत आहेत.

देठात पाण्याचा शिरकाव झाल्याने फळधारणेसाठी अडचणी येता आहेत. मागील चार वर्षांपासून अवकाळी पाऊस, थ्रीप्स रोगाचा प्रादुर्भाव आणि गेल्या वर्षी कोरोना आपत्तीमुळे आंबा उत्पादकांसाठी खडतर गेली आहेत. या वर्षी तरी चांगले उत्पादन येईल, अशी आशा होती; मात्र पडत असलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण पाहता मोहोराचे संरक्षण करून सुपारीएवढा आंबा मोठा करणे, हे उत्पादकांसमोर आवाहन आहे.  सद्यपरिस्थितीमुळे फेब्रुवारीऐवजी मार्चअखेरीस हापूस बाजारात दाखल होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मोहोर काळवंडत असून गळूनही पडतोय

सद्य:स्थितीला हवामान हापूसला पोषक नसून आलेला मोहोर काळवंडत असून तो गळूनही पडत आहे. त्यामुळे आंबा बागयतदार चिंतेत आहेत. हवामान बदलाची त्यांना प्रतीक्षा आहे. पुढील काही दिवसांत पोषक वातावरण निर्माण न झाल्यास त्याचा उत्पादनावरही मोठा परिणाम होणार असल्याचे आंबा बागायतदार सांगत आहेत.

"सध्याचे वातावरण हापूससाठी मारक आहे. पुढील वातावरण कसे असेल, यावर गणित अवलंबून आहे. उत्पादन, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावी लागणारी फवारणी हे सर्व पुढील वातावरणावर ठरले जाईल. त्यामुळे मार्च अखेर हंगाम सुरू होईल असे दिसते."

- रोहन शिंदे, आंबा बागायतदार

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is Amboli Waterfall famous during monsoon?
leopard body parts seized in Sindhudurg
All India Panther Sena demanded priority employment for Bahujan and local youth in Raigad industries, MIDC, logistics, and tourism sectors.
ratnagiri rain
Marathi News Esakal
www.esakal.com