

Pride of Raigad: Constable’s Son Joins National Defence Academy
Sakal
रायगड : देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससीच्या एनडीए (NDA – National Defence Academy) परीक्षेत रायगड जिल्ह्यातील मंथन संदीप नरुटे याने देशात अव्वल क्रमांक पटकावत लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या यूपीएससी एनडीए परीक्षेचा अंतिम निकाल ऑक्टोबर २०२५ मध्ये जाहीर झाला असून, मंथनने ४९० क्रमांक मिळवत देशात अव्वल ठरला आहे. त्यानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी त्याची अधिकृतपणे एनडीए – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये निवड झाली आहे.