#MarathaKrantiMorcha रसायनीमध्ये बंदला चांगला प्रतिसाद

लक्ष्मण डूबे 
बुधवार, 25 जुलै 2018

रसायनी (रायगड) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चा रसायनी परीसरातील सकल मराठा समाज यांच्यावतीने बुधवार (ता 25) रोजी बंदला येथील रसायनी पाताळगंगा परीसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे आणि इतर ठिकानी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच रसायनी व चौक परीसरातील कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर दांड फाटा येथे आणि द्रुतगती महामार्गावर  रीस गावाच्या हद्दितील सुमारे वीस वीस मिनिटे रस्ता रोको  केला आहे.

सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी काल व आज महाराष्ट्र बंदचे आव्हान केले होते. दरम्यान सकल मराठा यांच्या वतीने रसायनी परीसरात बंदची हाक देण्यात आली होती.  कार्यकर्त्यांनी सकाळी मोहोपाडा येथील छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. त्यानंतर मोहोपाडा नाक्यावर सर्वजण एकत्र जमले. तसेच  रस्त्यावर थोडा वेळ ठिय्या आंदोलन केले.  या ठिकानी रमेश पाटील, मारूती खाने, धनंजय देशमुख,  खंडुशेठ मालकर, रेश्मा भगत यांनी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे आणि शासनाचा निषेध करत विचार मांडले.  आणि मोहोपाडा ते चांभार्ली पदयात्रा काढली. त्यानंतर मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गवरील दांड फाटा आणि रीस गावाच्या हद्दित द्रुतगती महामार्ग विस विस मिनिटे रोखण्यात आला 

बंदला मोहोपाडा आणि  इतर ठिकानच्या व्यापारी, रिक्षा संघटना, आणि इतरांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच आज परीसरात काही शाळांना सुट्या देण्यात आल्या होत्या. पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: MarathaKrantiMorcha good response to Maharashtra band in rasayni