हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा रायगड जिल्ह्यातील एक सुवर्ण मुकुटच आहे. हा शिलालेख शिलाहार राजा पहिला केसीदेवराय यांच्या काळात लिहिला गेला आहे.
पाली : नुकताच मराठी भाषेला (Marathi Language) अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे, अक्षीचा शिलालेख (Inscription) हा मराठी भाषेतील सर्वात प्राचीन लेखनाचा पुरावा आहे. इ.स. १०१२ म्हणजेच शके ९३४ मध्ये कोरलेला हा शिलालेख रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग-चौल मार्गावरील अक्षी गावात मराठी भाषेचा अभिमान जोपासत उभा आहे. इतिहास व भाषा अभ्यासक, स्थानिक आणि पर्यटक या ऐतिहासिक ठेव्याला भेट देतात.