पाताळगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत बैठक झाली नसल्यामुळे नागरिकांत नाराजी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pollution

पनवेल येथे 16 नोव्हेबर रोजी आमसभा झाली आहे. धर्मराज जाधव यांच्या प्रदूषणाच्या मागणी बाबत अध्यक्ष आमदार मनोहर भोईर यांनी पाताळगंगा नदीच्या प्रदूषणाच्या समस्या बाबत पंधरा दिवसात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधिका-यांनी स्थानिक नागरिकांन सोबत पाताळगंगातील एमआयडीसी कार्यालयात बैठक घेऊन प्रदूषणाच्या समस्यां बाबत चर्चा करून सोडविण्याचे आदेश दिले आहे.

पाताळगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत बैठक झाली नसल्यामुळे नागरिकांत नाराजी 

रसायनी : पाताळगंगा नदीत चोरून  पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील आणि क्षेत्रा बाहेरील काही कारखान्यांतुन नैसर्गिक  नाल्यांतुन प्रदूषित सांडपाणी सोडण्याचे प्रकार वाढत चालले आहे. या कारखान्यांवर  कारवाई करावी आशी मागणी रसायनीतील सामाजिक कार्यकर्ते धर्मराज जाधव यांनी दोन महिन्यापुर्वी पनवेल येथे  झालेल्या आमसभेत केली आहे. मात्र या बाबत आजुनही बैठक झाली नाही त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

पनवेल येथे 16 नोव्हेबर रोजी आमसभा झाली आहे. धर्मराज जाधव यांच्या प्रदूषणाच्या मागणी बाबत अध्यक्ष आमदार मनोहर भोईर यांनी पाताळगंगा नदीच्या प्रदूषणाच्या समस्या बाबत पंधरा दिवसात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधिका-यांनी स्थानिक नागरिकांन सोबत पाताळगंगातील एमआयडीसी कार्यालयात बैठक घेऊन प्रदूषणाच्या समस्यां बाबत चर्चा करून सोडविण्याचे आदेश दिले आहे. तसे  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधिका-यांना कळविण्यात यावे आशा सुचना आमदार भोईर यांनी गटविकास आधिका-यांना दिल्या आहे. मात्र बैठक आजुन झाली नाही. असे सांगण्यात आले. संबंधितानी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांन मध्ये  तिव्र संताप व्यक्त होत आहे. 

दरम्यान पाताळगंगा नदीत आधुन मधुन चोरून नैसर्गिक नाल्यांतुन प्रदूषित सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरू असल्याची नदी काठच्या गावातील नागरिकांची तक्रार आहे. या प्रकाराला आळा घातला नाही तर नदीतील जलचर प्राण्यांचे आस्तितव धोक्यात येईल आशी भिती व्यक्त होत आहे. पाताळगंगा नदीत औद्योगिक क्षेत्रातील आणि क्षेत्रा बाहेरील काही कारखाने चोरून नैसर्गिक नाल्यांतुन प्रदूषित सांडपाणी सोडत आहे. ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाय योजना करावी. तसेच त्या कारखान्यानवर  कारवाई करावी. प्रदूषणाच्या समस्या बाबत बैठक घेण्यात यावी आशी मागणी आहे. असे धर्मराज जाधव यांनी सांगितले.