पालीत वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर, पर्यायी मार्गाला मुहूर्त सापडेना!

अमित गवळे 
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

पाली : अष्टविनायाकांपैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नेहमीच भाविकांची रेलचेल असते. नाताळच्या सुट्टयांमुळे तर हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होत असून भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पालीच्या बाहेरुन पर्यायी (बायपास) मार्गाला मंजुरी असूनही हा पर्यायी मार्ग लालफितीत अडकला आहे. या संदर्भात सकाळ मागील दोन तीन वर्षांपासून बातम्यांच्या पाठपुरावा करत आहे. 

पाली : अष्टविनायाकांपैक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत नेहमीच भाविकांची रेलचेल असते. नाताळच्या सुट्टयांमुळे तर हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्यामुळे येथे वारंवार वाहतुक कोंडी होत असून भाविक, पादचारी व विदयार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पालीच्या बाहेरुन पर्यायी (बायपास) मार्गाला मंजुरी असूनही हा पर्यायी मार्ग लालफितीत अडकला आहे. या संदर्भात सकाळ मागील दोन तीन वर्षांपासून बातम्यांच्या पाठपुरावा करत आहे. 

खाजगी, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरूंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यांमुळे पालीत सतत वाहतूक कोंडी असते. सुट्टयांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन वारंवार अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे. बल्लाळेश्वर मंदिर, ग. बा. वडेर हायस्कूल, जुने एस. टी. स्टँड, गांधी चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर या ठीकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. 

शाळा, महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस तर वाहतूकीवर अधिकच ताण येतो. पादचारी व विद्यार्थ्यांना येथून मार्ग काढणे अवघड होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नाक्या-नाक्यावर वाहतुक पोलीस तैनात असुन देखिल अरुंद रस्ते, अवजड वाहतूक, एकेरी वाहतुकीवररुन दुहेरी वाहतुक आणि वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम न पाळल्याने व रस्त्याच्या दुतर्फा अवैध्यरित्या पार्क केलेली वाहने यांमुळे पोलीसांना या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात बल्लाळेश्वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तैनात आहेत. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहचण्यास उशिर होतो. 

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्याची मागणी येथील नागरिकांकडून वारंवार होत आहे. बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराजवळ मार्ग काढण्याचा पर्याय आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखील मिळाली आहे. परंतू हा पर्यायी मार्ग लालफितीत अडकला आहे.

सध्या मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे. त्यामुळे पुण्या-मुंबई वरुन कोकणाकडे जाणारे प्रवासी खोपोली मार्गे पालीतून विळेमार्गे माणगावावरुन पुढे जातात. तर कोकणकडून येणारी वाहने माणगाववरुन विळे मार्गे पालीतून खोपोलीमार्गे पुणे-मुंबईकडे जातात. तसेच हा मार्ग सोयीचा व सुस्थितीत आहे. परिणामी पालीत प्रचंड वाहुक कोंडी होते.

बायपासला मंजुरी मिळाली आहे. यासाठी जमिनी अधिग्रहण करण्यासाठी दहा कोटी रुपये मंजुर झाले आहेत. या पर्यायी मार्गासाठी जमिनी हस्तांतरणाच्या फाईल त्यातील त्रुटी दुर करण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (महा. शासन), पाली यांच्याकडे पाठविल्या आहेत. परंतु त्यावर अजून कुठलेही काम झालेले नाही. या संदर्भात जुलै महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे सुरु आहे, असे सुधागड तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश मपारा यांनी सांगितले. 

 

Web Title: Marathi news traffic problem in pali raigad district, optional road not approved