कोकण रेल्वेच्या सहा स्थानकांवर वैद्यकीय कक्ष 

Medical Room At Six Stations Of Konkan Railway
Medical Room At Six Stations Of Konkan Railway
Updated on

रत्नागिरी - कोरोनाला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनही सज्ज झाले असून प्रवाशांशी निगडीत येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर्स्‌चा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोकण रेल्वेच्या सहा स्थानकावर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुसज्ज कक्ष तयार केला असून सुमारे साठ रुग्णांची तिथे तपासणी करता येणार आहे, असे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. 

कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांमधून नियमित हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्यातून करोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या आहेत. कोरेच्या सर्व गाड्यांमध्ये नियमित फॉगिंग, साफसफाई आणि निर्जंतुकीकरण केले जात आहे. गाड्यांमधील परिभ्रमण क्षेत्र, रेल्वेस्थानक परिसर, पायऱ्या, शौचालये, बुकिंग कार्यालये, प्रतिक्षालय, रेल्वेस्थानकावरील कार्यालयीन खोल्या, डेस्कचे काऊंटर, दरवाज्याचे हॅण्डल आणि ज्या ठिकाणी प्रवासी हाताने वारंवार स्पर्श करतात ती ठिकाणे स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे.

कोकण रेल्वे मार्गावर कोरोनाच्या उपचारासाठी हेल्पलाईन क्रमांक 10722 कार्यान्वित केला आहे. तसेच वातानुकूलीत डब्यातील ब्लॅंकेट व पडदे काढून टाकण्यात आले आहेत. रेल्वे प्रवाशांशी संवाद साधणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना हॅंड सेनिटायझर्स आणि मुखवटे दिले आहेत. कोकण रेल्वेने महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर आरोग्य युनिट सज्ज ठेवले आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफ यांच्या देखरेखीखाली एकूण 60 बेड आहेत. चिपळूणला 7, रत्नागिरी 20, वेर्णा 8, मडगाव 10, कारवार 5, उडुपी 10 बेडचा समावेश आहे. रेल्वेस्थानकांवर जागरूकता करण्यासाठी करोनाविषयक पोस्टर्स आणि रेल्वेस्थानकात जाहीर घोषणा दिल्या जात आहेत. अनावश्‍यक जाहीर सभा आणि मेळावे टाळण्यात येत आहेत. 

कर्मचाऱ्यांसाठी चर्चासत्र 

रेल्वेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, अभ्यागतांना हात, श्वसनविषयक स्वच्छता आणि सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हाऊसकीपिंग, कमर्शियल, रनिंग आणि फ्रंट लाइन स्टाफसाठी जनजागृती चर्चासत्रांचे आयोजन कोकण रेल्वेने केले आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com