

Hazardous Medical Waste Found Near Amba River Bridge
Sakal
पाली : वाकण पाली राज्य महामार्गावर पालीतील अंबा नदी पुलाजवळ मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन, इंजेक्शन सुई, सलाईन व इतर वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. ही घटना समोर येताच येथील शेतकरी व स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा घातक वैद्यकीय कचरा अजूनही या ठिकाणी तसाच पडून आहे.