कोकणात पार्सल ट्रेन घेऊन आली औषधाचा साठा .....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 एप्रिल 2020

कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीत कोकण रेल्वेने औषध साठा आणि पोरबंदर येथून केरळला मासळी पाठवण्यात आला आहे

रत्नागिरी : कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीत कोकण रेल्वेने औषध साठा आणि पोरबंदर येथून केरळला मासळी पाठवण्यात आला आहे. रत्नागिरीतील औषधाच्या होलसेल विक्रेत्यांना याचा फायदा झाला आहे.

सर्वसामान्य लोकांना आवश्यक जीवनावश्यक गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला होता. ती गाडी सोमवारी दुपारी ओखा येथून पार्सल घेऊन रवाना झाली होती. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकावर दाखल झाली.  या गाडीत गुजरातहुन कोंकणासह दक्षिणेकडील भागांना आवश्यक्य औषध साठा आणि अन्य साहित्य होते. रत्नागिरी जिल्ह्यातील होलसेल औषध विक्रेत्यांच्या ऑर्डर नुसार औषधाचे सुमारे 35 बॉक्स स्थानकात उतरवण्यात आले. त्यामुळे औषधाचा पुरेसा साथ विकर्त्यांकडे उपलब्ध होणार आहे. ही गाडी रत्नागिरीहुन त्यानंतर  ही रेल्वे कणकवलीकडे रवाना झाली.

हेही वाचा- हुश्श ः मराठा कॉलनीत सुटकेचा निःश्‍वास

कोकणरेल्वे मार्गांवर रत्नागिरीसह, कणकवली, मडगाव आणि उड्डपी या स्थानकांवर  माल चढवता उतरवता येणार आहे. या गाडीला पाच डबे पार्सलसाठी जोडण्यात आले होते. त्यातील एका डब्यात पोरबंदरहुन केरळला मासळी पाठवण्यात आली आहे. इतर साहित्य आणि मासळी साठी या गाडीत व्यवस्था करण्यात आली आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही व्यवस्था करता येणार आहे.

हेही वाचा-...तर जगभरातील कोरोना संकट होईल दूर                                                  

24 एप्रिलला ही गाडी परतीच्या प्रवासाला निघणार असून रत्नागिरीत ती रात्री 11.30 ला पोचेल.  या गाडीतून किती आंबा पाठवला जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.  अहमदाबाद ला आंबा पाठवणारे कोंकणातील अनेक उत्पादक आहेत.  परंतु लोकडवूनमुळे सगळीकडे वाहतूक बंद असल्याने रेल्वे स्थानकावरून आंबा व्यवसायीक किंवा थेट ग्राहकाकडे कसा पाठवायचा हा प्रश्न बागायतदार यांना पडला आहे. त्यातुन मात करत आंबा पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medicine stocks from parcel train at Ratnagiri Kankavali kokan marathi news