दोडामार्ग तालुक्यात रविवारी झालेल्या वादळ, गारपीट आणि जोरदार पावसामुळे आठ ते दहा गावांतील केळी बागा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या आहेत.
वैभववाडी : दोडामार्ग तालुक्याला (Dodamarg Taluka) वादळी वारा, गारपीटीसह अवकाळीने झोडपून काढल्यानंतर आता पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर (Sindhudurg Rain) पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) बुधवारी (ता. २६) सिंधुदुर्गात पावसाचा अदांज दिला असल्याने आंबा, काजू बागायतदारांची धास्ती वाढली आहे.