esakal | 'मी सत्तेत असताना साथ मात्र मला विरोधकांनी दिली' म्हणत कुडाळचे सभापती भाजपमध्ये दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

meters of shivsena from kudal entry in BJP party yesterday in kudal ratnagiri

शिवसेनेच्या वरिष्ठांसह आमच्या सदस्यांनी कधीच साथ न दिल्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे आईर यांनी सांगितले.

'मी सत्तेत असताना साथ मात्र मला विरोधकांनी दिली' म्हणत कुडाळचे सभापती भाजपमध्ये दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील पंचायत समिती सभापती नूतन आईर यांच्यासह रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर व अन्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्या सभापती झाल्या होत्या. शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या वरिष्ठांसह आमच्या सदस्यांनी कधीच साथ न दिल्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे आईर यांनी सांगितले.

आईर यांची सभापतिपदाची कारकीर्द एक वर्षाच्या उंबरठ्यावर आली होती. राजकीय गोटातून बदलाचे संकेत मिळत होते. त्याचे पडसाद उमटण्यापूर्वीच आईर यांनी आमदार राणेंच्या नेतृत्वाखाली कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीत शिवसेना १० व आता सभापतींसह भाजपची संख्या आठ झाली आहे.

हेही वाचा -  मिऱ्या बंधरावर लवकरच होणार आता समुद्राखालील जग पाहण्याचे स्वप्न पुर्ण -

राणे व जिल्हाध्यक्ष तेली यांनी आईर सरपंच नागेश आईर यांचे भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले. रांगणातुळसुली गावातील सुमारे दीडशे प्रवेशकर्त्याचे भाजपने पंचायत समितीच्या प्रांगणात स्वागत केले. सभापती यांच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रतिमा लावण्यात आली. 

यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्ष ओंकार तेली, तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, भाजप युवा प्रवक्ता दादा साईल, दीपक नारकर, राकेश कांदे बाबा परब, बंड्या मांडकूलकर, दीपक नारकर, आनंद शिरवलकर, अविनाश पराडकर, अरविंद परब, बंड्या सावंत, पप्या तवटे, संदेश नाईक, अस्मिता बांदेकर, सुप्रिया वालावलकर, ममता धुरी, स्वप्नाली वारंग, रेवती राणे, दीपलक्ष्मी पडते, देवेंद्र सामंत, अदिती सावंत, विजय कांबळी, गजानन वेंगुर्लेकर, संदीप सावंत, रचना नेरुरकर, आरती पाटील, साक्षी सावंत, मोहन सावंत, राजू राऊळ, सुनील बांदेकर, नागेश परब, अजय आकेरकर, सतीश माडये, राजू बक्षी, तसेच कणकवली येथे तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, सोनू सावंत, संदीप सावंत उपस्थित होते.

प्रवेशानंतर आईर म्हणाल्या, ‘‘सभापतिपदाचा कार्यभार आता एक वर्ष होणार आहे. या वर्षभरात सातत्याने मला शिवसेनेकडून विश्‍वासात घेतले गेले नाही. सत्ताधारी सदस्यांनी कधीच सहकार्य केले नाही. याबाबत मी सत्ताधारी असतानाही विरोधकांनी मासिक सभेवेळी साथ दिली. शिवसेनेतील वरिष्ठांना सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मी आज आमदार राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आज माझ्या प्रवेशाने गावातील दीडशे जणांनी प्रवेश केला. सभापतिपदाचा वापर कुडाळ तालुक्‍याच्या विकासासाठी करणार असून, आतापर्यंत सत्ताधारी म्हणून सभापतिपद स्वीकारले. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी सामना केला तसाच सामना करायला मी तयार आहे.’’

हेही वाचा - बॅक वॉटर देईल कोकणातील तरुणांना रोजगार ; मार्केटिंगमुळे मिळेल पर्यटनाला चालना 
 

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देसाई म्हणाले, ‘‘आमदार वैभव नाईक यांना ऐन दिवाळीमध्ये सभापती प्रवेशाने चांगला दणका दिला आहे. त्यांच्या मतदारसंघात दोन्ही सभापती हे भाजपचे बसले आहेत. आता जिल्ह्यात शिवसेनेला धक्के देण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच रांगणातुळसुली गावातील इतर लोकप्रतिनिधींचा प्रवेश आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळमध्ये होणार आहे. शिवसेनेचे १० सदस्य असले तरी तीन ते चार सदस्य सभागृहात सभापतींना मदत करतील.’’
 

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top