म्हाडाची उच्चस्तरीय बैठक 26 ला रत्नागिरीत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 August 2019

रत्नागिरी - कोकणातील प्रस्तावित प्रकल्पांना मंजुरी देण्याबरोबरच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी म्हाडा प्राधिकरणाची उच्चस्तरीय बैठक 26 ऑगस्टला रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. म्हाडा प्राधिकरणाची बैठक म्हाडा भवनाच्या बाहेर प्रथमच होत असून हा महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतला असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली. 

म्हाडामार्फत राज्यातील विविध भागात मोठमोठे प्रकल्प राबविले जात आहे. म्हाडा अध्यक्षपदाचा मान कोकणाला प्रथमच मिळाला आहे. म्हाडाच्या माध्यमातून कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी, चिपळूणसह इतर जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव म्हाडाकडे आले आहेत.

या प्रस्तावांबाबत बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी संजय गुप्ता, नितीन करीन, उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई म्हाडा अध्यक्ष मधू चव्हाण यांच्यासह म्हाडाच्या विविध कमिटीचे अध्यक्ष, सचिव राधाकृष्ण बी., श्री. वर्मा यांच्यासह 50 अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने म्हाडाचा कारभार कसा हाकला जातो याची माहिती रत्नागिरीकरांना होणार आहे. तसेच म्हाडाच्या माध्यमातून विविध प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhada High Level Meeting on 26th Ratnagiri