मंडणगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंचा आपण विचार करत नाही. त्यामुळे मनाला वेदना होतात. महापुरुषांना जातीधर्माच्या दृष्टिकोनातून बघतोय, ही दुर्दैवी गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या आदर्शानुसार काम करत आहे, असे सांगून लवकरच मंडणगडमध्ये एक हजार एकरमध्ये उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून एमआयडीसी (Mandangad MIDC) उभारली जाईल, अशी घोषणा महसूल राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी केली.