esakal | दापोली तालुक्यात धुवाँधार; हर्णेसह परीसरातील गावांना स्थलांतराच्या सूचना; 2 दिवस घराबाहेर न पडण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

दापोली तालुक्यात धुवाँधार; हर्णेसह परीसरातील गावांना स्थलांतराच्या सूचना

दापोली तालुक्यात धुवाँधार; हर्णेसह परीसरातील गावांना स्थलांतराच्या सूचना

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णे (रत्नागिरी) : येथे दोन दिवस झालेल्या धुवाँधार पावसाने संरक्षक भिंत कोसळली. यामुळे हर्णे (Harne)बायपास रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने हर्णे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी गावाचा सर्व्हे करून सर्वाना आजच तातडीने स्थलांतराच्या सूचना(Migration notice) दिल्या आहेत. कोणालाही स्थलांतर होण्यास अडचण असेल तर त्याने थेट ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा असेहो यावेळी आवाहन करण्यात आले.(migration-notice-to-surrounding-villages-ratnagiri-rain-update)

दापोली तालुक्यात सध्या पावसाने चांगलाच जोर धरलेला असल्याने प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील दोन दिवस म्हणजे ११ व १२ जून यादिवशी कुठेही बाहेर न पडण्याचे आदेश देउन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातच आज (ता.१०) सकाळी दापोली हर्णे अडखळ मार्गावरील एका विकासकाने बांधलेली संरक्षक भिंत हर्णे बायपास रोडवर कोसळली. यानंतर दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील व दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर आलेली माती व चिरे जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला.

हेही वाचा- कोरोनाने डाकसेवकाचा मृत्यू झाल्यास वारसाला मिळणार नोकरी; मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

हर्णे परिसरामध्ये देखील सरपंच- ऐश्वर्या धाडवे, उपसरपंच- महेश पवार, सर्व सदस्य, तलाठी- अमित शिगवण, ग्रामविकास अधिकारी- कृष्णाद साळुंखे, हर्णे बिटचे हवालदार- दिलीप गोरे, आणि त्यांचे सहकारी यांनी संपूर्ण हर्णे गावाचा सर्व्हे केला आणि राजवाडी, धुळपवाडी, सुतारवाडी, राणेवाडी, मोठीगोडीबाव, धाकटी गोडीबाव, भाटवाडी, कुंभारवाडी, नाथद्वार नगर, सागरपुत्र कोळीवाडा, फणसवाडी, फत्तेगड यामध्ये डोंगराळी भाग व किनारपट्टीलगत असणारी ८७ घरांमधील आणि ४३१ लोकांनां पुढील दोन दिवसांकरिता राहत्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच स्थलांतर होताना कोणास काहीही अडचण निर्माण होत असेल तर ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा असे ग्रामपंचायतीकडून आवाहन करण्यात आले.