
शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. अगदी साधं सर्दीतापाचं उदाहरण घ्या. सर्दीतापाने बेजार झालेल्या माणसाचं डोकं दुखतं, अंग दुखतं, शरीर गळून गेल्यासारखं वाटतं, मग मन उदास होतं, कधी चिडचिड करतं आणि अंथरूणांत लोळत पडावं असं वाटतं. हा सारा शारीरिक आजाराचा मानसिक परिणाम आहे, हे आपल्याला समजतं. आपण ते मान्य करतो आणि स्वीकारतोही; पण मनाचा शारीरिक आजारांवर परिणाम होऊ शकतो, हेच मुळी आपण मान्य करायला तयार नसतो; पण हे मान्य केले पाहिजे. कारण, काय याबाबत येथे माहिती दिली आहे.
- डॉ. शाश्वत शेरे, मनोविकारतज्ज्ञ