esakal | पर्यटनदृष्ट्या `या` घाटाचा विकास करण्याचे  मंत्री अनिल परब यांचे आश्‍वासन
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Anil Parab Assurance To Develop Kumbharli Ghat In Terms Of Tourism

पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा आणि निसर्गाची मुक्त उधळण असेलेल्या कुंभार्ली घाटाच्या समस्या संदर्भात पालकमंत्री अनिल परब यांची माजी सभापती पूजा निकम यांनी भेट घेऊन महत्त्वपूर्ण मागणी केली.

पर्यटनदृष्ट्या `या` घाटाचा विकास करण्याचे  मंत्री अनिल परब यांचे आश्‍वासन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - कुंभार्ली घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याची आणि रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडी तोडण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी माजी सभापती पूजा निकम यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे केली. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा घाट विकसित करण्याची गरज आहे असेही निकम यांनी सांगितले. याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा आणि निसर्गाची मुक्त उधळण असेलेल्या कुंभार्ली घाटाच्या समस्या संदर्भात पालकमंत्री अनिल परब यांची माजी सभापती पूजा निकम यांनी भेट घेऊन महत्त्वपूर्ण मागणी केली.

कुंभार्ली घाटातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. हे खड्डे तत्काळ बुजवण्याची मागणी करताना येथील अवघड वळणार आणि रस्त्याच्या बाजूस प्रचंड झाडी वाढली आहे. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही झाडी तोडण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करत संबंधित यंत्रणेला आदेश दिले जातील, असे सांगितले.

हा घाट पर्यटनाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, या ठिकाणी गाड्या पार्किंग अथवा खाद्याची दुकाने आणि पर्यटकांना या ठिकाणी उभे राहण्यासाठी जागा नाहीत. शिवाय घाटातील डोंगरांना सुरक्षेसाठी जाळी बसवावी. या ठिकाणी घाटाचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला गेला तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल आणि पर्यटकांना आकर्षित करणारा हा घाट ठरले, असे माजी सभापती पूजा निकम यांनी सांगितले. 

खास प्रयत्न करून.. 

घाट पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करावा, अशी मागणी केली असता आमदार शेखर निकम आणि आपण यासाठी खास प्रयत्न करून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने घाटाचा विकास करण्याचा शब्द पालकमंत्री परब यांनी दिला. 

loading image
go to top