आमनेसामने या, मग बघूया : उदय सामंत ; पालकमंत्री आणि मी एकत्र काम करतोय... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

कोकणासाठी शेल्टर योजना मंजूर झाल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

 

रत्नागिरी : चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे आणि राजकारण करण्याचे काम काहीजण करत आहेत. पण आम्ही चार ते पाच टर्म आमदार म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे पालकमंत्री ऍड. अनिल परब आणि मी एकत्र काम करत आहोत. वाद लावण्यासाठी बालीश टीका कोणी करू नयेत, अशी टीका करतानाच कोकणासाठी शेल्टर योजना मंजूर झाल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

विरोधकांनी बालीशपाणाच्या टीका करू नयेत 

ते म्हणाले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात फळबागायतीदारांना सर्वाधिक फायदा मिळवून देण्याकरीता 1992 ची रोजगार हमी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. वादळामध्ये अनेक झाडांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे रोहयोच्या जुन्या निकषात बदल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यासह बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. विरोधकांकडून खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्याचा आग्रह धरला जात होता. मात्र, सर्वसामान्यांचा आणि भविष्याचा विचार करून आम्ही शासकीय रुग्णालयात प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी आरोपासाठी आरोप करु नयेत. आजच्या घडीला मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी काम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री परब आणि मी एकत्र काम करतोय. 

हेही वाचा- हुश्‍श...वाचलो बाबा! असे का म्हणतायत साळशिंगकर? -

आमनसामने या, मग बघूया.. 
उदय सामंत सिंधुदुर्गचे पालकमंत्री असले तरीही आम्ही जबाबदारी वाटून घेतलेली आहे. ते कोकणात राहून इथे संपर्कात आहेत. मुंबईतून जी मदत लागते, ती मी करत असतो. कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. केबीनमध्ये एसीत बसून आरोप करणे सोपे आहे. आमनसामने या, मग बघूया कोण किती मदत करते ते, असे सांगत ऍड. परब यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नसल्याच्या विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of Higher and Technical Education uday samant online press conference in kokan ratnagiri