नीतेश राणे म्हणाले, "औरंगजेबाची निशाणी नष्ट केली आहे. आता औरंगजेबाची कबर (Aurangzeb's Tomb) उखडून काढू. सरकारने काढली नाही, तर आम्ही काढू."
संगमेश्वर : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे कसबा येथे असे स्मारक उभारू की, जगभरातील सर्वजण या ठिकाणी येऊन नतमस्तक होऊन जातील, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री आणि रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. तसेच औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी लाँग मार्च काढू, असा इशाराही त्यांनी दिला.