मंडणगड : जगातून अभ्यासक, पर्यटक येतील असे भव्यदिव्य स्मारक बाबासाहेबांच्या आंबडवे या मूळगावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे असेल, ज्ञानस्मारक असेल. बाबासाहेबांच्या विचाराला तडा देण्याचा जो प्रयत्न करेल त्याला महाराष्ट्र शासन नक्की शासन करेल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत (Dr. Uday Samant) यांनी दिली.