रत्नागिरी : शासनाच्या विविध विभागांच्या योजना या सर्वसामान्यांसाठी आहेत. त्या समजून घेणे गरजेच आहे. अशा योजनांच्या (Government Scheme) नावावर कुणीही पैसे मागत असेल तर त्याचे नाव आणि नंबर सांगा, त्याच्यावर कारवाई केली जाईल. पैसे मागणाऱ्यांबरोबरच पैसे देणाराही तितकाच दोषी आहे, तुमच्यासाठी असणाऱ्या योजनांसाठी पैसे देऊ नका, असे आवाहन पालकमंत्री सामंत (Uday Samant) यांनी केले.